Maval : तुंग येथे झाडाला नऊजणांचे फोटो लावून ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न ?

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील तुंग येथे नऊ जणांचे फोटो झाडाला लावून त्यांना लिंबू, काळ्या बाहुल्या, बिबा, टाचण्या, खिळे ठोकून भानामती केल्याची घटना घडली आहे. काळी जादू करण्याच्या या प्रयत्नामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुंग माध्यमिक विद्यालयापासून जवळच असलेल्या एका अशोकाच्या झाडाला हे फोटो व काळ्या जादूचे साहित्य ठोकल्याचे आढळून आले आहे. वेगवेगळ्या गावातील प्रमुखांचे फोटो शोधून ते या ठिकाणी लावले आहेत. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे या घटनेची चौकशी करून त्यामागील सूत्रधार व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे

पांडुरंग कृष्णा जांभूळकर (रा. कोळे चाफेसर), संदीप एकनाथ पाठारे (रा. तुंग), किसन बंडू ठोंबरे (रा.तुंग) योगेश घाडगे (रा.पानसोली), संजय कोकरे (रा. चाफेसर), संतोष कोंडिबा हघारे (रा.महागांव), कश्वर शेख, अजय मेहता (रा. आतवण), मनोज सेनानी यांच्या फोटोचा वापर या घटनेत करण्यात आला आहे.

अतिशय चलाखीने फोटो गोळा करून निर्जळस्थळी ही घटना केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामागचा सूत्रधार शोधण्याचे आव्हान लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर आहे. समाजात अंधश्रद्धा आणि दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.