Maval: आचारसंहिता उल्लंघनाच्या ऑनलाईन 145 तक्रारी

एमपीसी न्यूज – आचारसंहितेचे उल्लंघन करणा-यांची तक्रार नोंदविण्यासाठी ‘सी व्हिजिल मोबाईल ऍप’ ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून ऍपच्या माध्यमातून 145 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रारी नोंदविण्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो ‘अपलोड’ करावा लागणार आहे. यानंतर ही माहिती अनुचित प्रकार टाळण्यासाठी तयार केलेल्या भरारी पथकाला समजल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल मोबाईल ऍप सुरु करण्यात आले आहे. हे ऍप मतदानापर्यंत सुरु राहणार आहे. मतदारसंघातील नागरिकांना या ऍपच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची सूचना देता येते. निवडणूक आयोगाकडून तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. तक्रारीची शहानिशा करुन तक्रारीचे निवारण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.