Maval : शिवसेनेच्या वतीने चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Burning of symbolic statue of Chinese President on behalf of Shiv Sena

एमपीसी न्यूज – लडाख येथिल गलवान प्रदेशात 15 जूनच्या रात्री झालेल्या चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहिद झाले होते. चिनी सैनिकांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

कान्हे फाटा ( ता. मावळ) येथे हे आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी शहिद सैनिकांना आदरांजली वाहण्यात करण्यात आली. तसेच, चीन विरोधी घोषणा देण्यात आल्या. या पुढे कुरापतखोर चीनची कुठलीही वस्तू कोणीही खरेदी करायची नाही, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी युवासेना मावळ तालुका विस्तारक राजेश पळसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजू खांडभोर, महिला आघाडी प्रमुख व जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, देहू शहरप्रमुख सुनिल हगवणे, तळेगाव शहरप्रमुख दत्तात्रय भेगडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, शिववाहतुक सेना जिल्हाप्रमुख पंकज खोले, युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, जयदत्त ठाकर, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनिष पवार, नितिन देशमुख, दत्ता केदारी, विनायक हुलावळे, मंगेश येवले, सोपान येवले, मंगेश काकरे, मयुर थोपटे, प्रकाश थरकुडे, महादु हेमाडे, प्रतिक काकरे, अक्षय हुलावळे, संतोष पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.