Maval : सातत्यपूर्ण कष्टासह योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसाय व रोजगार निर्मिती शक्य -सुधाकर शेळके

एमपीसी न्यूज – “सातत्यपूर्ण कष्ट केले व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी खूप मोठा उपयोग होतो, असे प्रतिपादन मावळचे
उद्योजक सुधाकर शेळके यांनी केले आहे.तळेगाव दाभाडे येथील रुडसेट संस्था यांच्यावतीने मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण ३० दिवस च्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने केली व तीस दिवसांमध्ये मोबाईल मधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच बरोबर समाजासाठी योग्य मार्गदर्शन कसे असते व यशस्वी उद्योजक कशाप्रकारे तयार होतो याचे उत्तम मार्गदर्शन या दिवसांमध्ये मिळाले असे कथन करताना शरद जांभूळकर, अक्षय इंगळे, प्रथमेश घोजगे व संतोष आलम यांनी केले.या कार्यक्रमास रुडसेट संस्था चे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य व साप्ताहिक ‘अम्बर’चे संपादक सुरेश साखवळकर,ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे , संचालक जयंत घोंगडे व प्रशिक्षक हरीश बावचे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेले साप्ताहिक अंबर सुरेश साखळकर यांनी मार्गदर्शन करताना मोबाईलच्या माध्यमातून ज्ञानाचा ठेवा जपत व्यवसायाची वृद्धी करावी.ज्येष्ठ पत्रकार गोपाळे गुरुजी यांनी शुभेच्छा देताना संस्था समाजासाठी करत असलेलं काम आपण व्यवसाय वाढताना इतरांनाही मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन केले.

संस्थेचे संचालक जयंत घोंगडे यांनी यांनी आयुष्यात ध्येय ठेवून पुढे गेला तर निश्चितच यशस्वी व्हाल व व्यवसायाचा हिशोब योग्य रीतीने ठेवला तर प्रगतीचे एक पाऊल निश्चितच पुढे जाल व आपल्या व्यवसायाबरोबर इतरांनाही नोकरी देणारे व्हाल हे सांगून संस्था यापुढे सतत तुमच्या बरोबर आहे हे
विसरू नका व व्यवसाय वाढवून नवनवीन बेरोजगारांना तुमचा यशस्वी मार्ग दाखवा.

या प्रशिक्षण कार्यक्रमास पुणे जिल्हा व परिसरातील जवळजवळ जवळजवळ पंचवीस ते तीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक यशस्वी उद्योजकांना संस्थेतर्फे विनामूल्य प्रोजेक्ट रिपोर्ट व विविध कर्ज योजनेचे फॉर्म भरून देण्यात आले व ते फॉर्म त्यांच्याजवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावे असे सांगण्यात आले.

यावेळी यावेळी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच म्हणजे संस्था सोडल्यानंतर आपण जे शिकलो आहोत त्याचा उपयोग व सराव होण्यासाठी संस्थेतर्फे टूल किट व संस्थेचा ड्रेस देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश बवचे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष आलम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी , संदीप पाटील, योगिता गरुड , दिनेश निळकंठ ,रवी घोजगे व बाळू अवघडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.