Maval: मतदान केंद्रावर पोलिसांबरोबरच कॅमे-याची नजर

एमपीसी न्यूज- निवडणूक कालावधीत मतदान केंद्रावर कोणातही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व मतदान केंद्रावर पोलीस ठाण्यानुसार मोबाईल व्हेईकलद्वारे नजर ठेवणार आहे. यावळी गस्त घालणा-या गाड्यांवर एक कॅमेराही दिला जाणार आहे. या कॅमे-याद्वारे मतदानकेंद्राचे चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक सेक्टरसाठी एक कॅमेरा देण्यात आला आहे.

ज्या भागात संवेदनशील मतदानकेंद्र आहेत. तिथे सर्वाधिक पोलीस फौजफाटा देण्यात आला असून त्यानुसार गस्तीचे प्रमाणही अधिक असणार आहे. यावेळी प्रत्येक दहा बुथमागे एक क्वीक अॅक्शन टीम ठेवण्यात आली आहे. ही टीम फोन किंवा अन्य प्रकारे माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात संबंधित बुथपर्यंत पोहचू शकेल. संपूर्ण मावळ मतदारसंघात विधानसभा मतदारसंघानुसार सहा सेक्टर करण्यात आले आहेत.
  • त्यानुसार प्रत्येक सेटक्‍टरला एक मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रायकींग फोर्सही गस्त घालणार आहे. यामध्ये महसूल विभागाच्या अधिका-यांचाही समावेश असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.