Maval : वडगाव मावळमध्ये गणेश जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि अन्नदान करण्यात आले.

वडगाव मावळ येथे विविध गणेश मंडळे आणि गणेश मंदिरात गणेश जयंती साजरी करण्यात आली. केशवनगर येथे गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी देखील 28 जानेवारी रोजी गणेश जयंती साजरी झाली.

केशवनगर येथील गणेश मंदिरातील गणेशाचा पहाटे अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी आठ वाजता श्री गणेशयाग आणि त्यानंतर दुपारी गणेश जन्मोत्सव साजरा झाला. दुपारी जाखमाता देवी भजनी मंडळ आणि जय मल्हार प्रासादिक भजनी मंडळ कडधे या मंडळांनी आपली भजन सेवा सादर केली.

संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाची भजन सेवा झाली. तसेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाप्रसादाचे वाटप झाले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मनोज कांताराम पानसरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.