Maval : खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रकांत पाटील क्रिकेटच्या मैदानात

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Maval) यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचे उद्वघाटन करण्यात आले. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनीही क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित होते.

Maharashtra : ईडी विरोधात न्यायालयामध्ये धाव घेणार – सुषमा अंधारे

बारमुख क्रिकेट स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची सोय (Maval) झाली आहे. वेळसे पवनानगर येथील क्रिकेट स्टेडियमचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यात येईल. इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी आणखीन स्टेडियम उभारावे यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना आश्वास्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.