Maval: मावळ तालुका इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शेटे तर सचिवपदी खांडगे

Maval: chandrakant Shete as President of Maval Taluka English Medium School Association and santosh Khandge as Secretary दर्जेदार शिक्षण देणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनेक जाचक शासन निर्णयाला सामोरे जाताना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे असोसिएशनची स्थापना करण्यात आली.

एमपीसी न्यूज- मावळ तालुका इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनच्या अध्यक्षपदी चंद्रकांत शेटे आणि सचिवपदी संतोष खांडगे यांची निवड झाली. दि. 27 जून रोजी असोसिएशनची स्थापना करण्यात आली.  त्यावेळी ही निवड करण्यात आली. ही बैठक नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज सभागृहमध्ये झाली.

यावेळी मावळ तालुक्यातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनेक जाचक शासन निर्णयाला सामोरे जाताना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये असोशिएशनची उद्दिष्टे व कार्यकारिणी मंडळ सर्वानुमते ठरवण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
उपाध्यक्ष- गणेश खांडगे
कार्याध्यक्ष – गणेश भेगडे
खजिनदार- प्रकाश ओसवाल
सहसचिव- संदीप काकडे
सहखजिनदार – राजेंद्र म्हाळसकर

संचालक मंडळ पुढीलप्रमाणे-
शैलेश शहा, बाळासाहेब शेळके, यादवेंद्र जोशी, भगवान शेवकर, शिवाजी आसवले, लक्ष्मण भालेराव.

शाळांची नावे-
बालविकास विद्यालय, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, मामासाहेब खांडगे सीबीएसी इंग्लिश स्कूल, सह्याद्री इंग्लिश स्कूल, कृष्णराव भेगडे, रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूल, जैन इंग्लिश स्कूल, कांतीलाल शाह इंग्लिश स्कूल, ज्ञानबोधिनी इंग्लिश स्कूल, इंद्रायणी इंग्लिश स्कूल, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, बाळराजे असवले इंग्लिश स्कूल, संकल्प इंग्लिश स्कूल.

दरम्यान, आरटीई प्रतिपूर्ति पाठपुराव्यासारख्या मुद्दयावर संघटना निरंतर कार्य करेल व सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी उपयुक्त कार्य करेल असा विश्वास अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केला.

सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी संघटित होवून अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे हाच योग्यमार्ग असल्याने असोशिएशन सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या हक्क व अडचणींसाठी कार्यरत राहिल, असे मत असोशिएशनचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले. गणेश भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.