Maval  : महावितरणच्या कामशेत कार्यालयात अनागोंदी कारभार

एमपीसी न्यूज – महावितरणच्या कामशेत कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू (Maval )असल्याचे निदर्शनास आले आहे. ताजे गावातील एका ग्राहकाचे विज बिल थकलेले असताना देखील त्याला नवीन वीज जोडणी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे कामशेत परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
कामशेत हद्दीतील  ताजे गावातील गट नंबर 622,  623 मधील प्लॉटिंग मध्ये वडगाव उपविभाग अभियंता यांनी पाहणी केली असता त्यांच्या असे निदर्शनात आले की ताजे येथील वरील गट क्रमांक मध्ये ग्राहकाची वीज बिलाची 81,520 रुपयांची थकबाकी असताना नवीन वीज जोड कनेक्शन देण्यात आले आहे. यामुळे महावितरण कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.

 

 

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर केंद्रावर बारावीच्या परीक्षा शिस्तबद्ध पार पडल्या

 

तसेच कंपनीचा महसूल बुडवला असल्याचे देखील निदर्शनात येत आहे. यामुळे वडगाव मावळ येथील उपकार्यकारी अभियंता यांनी कामशेत विभागाच्या प्रमोद महाजन यांना स्मरण पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याचे सांगितले आहे याबाबत वारंवार प्रमोद महाजन यांना पत्र लिहून खुलासा करण्यास सांगितले असताना देखील प्रमोद महाजन हे खुलासा करत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी देखील वडगाव उपविभागीय कार्यकारी अभियंता विवेक सूर्यवंशी यांनी राजगुरुनगर कार्यकारी अभियंता यांना देखील कळवले आहे.

 

Pune News : पुण्यात भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या  सैन्यदलांत मंगळवारी संयुक्त सराव

कामशेत विभागाचे महावितरण प्रमुख प्रमोद महाजन यांच्याबाबत नागरिकांकडून (Maval ) अनेक तक्रारी असून नागरिकांशी उद्धट बोलणे, महावितरण कार्यालयात नागरिकांच्या समस्या न सोडवणे, अरेरावी करणे, त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने नागरिकांना महावितरणचा महसूल बुडून कनेक्शन देणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कामशेत मधील नागरिक करताना दिसत आहे.
कामशेत परिसर व आजूबाजूच्या गावांमध्ये वाढती लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस महावितरणचे अधिकारी व त्यांनी ठेवलेल्या काही कंत्राटी  लोकांकडून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी कामशेत शहरातील नागरिकांना तसेच आजूबाजूच्या लगत असणाऱ्या गावातील रहिवाशांना जर नवीन कनेक्शन हवे असल्यास ते देण्यास विलंब करतात  नागरिकांना चोरून कनेक्शन देत असल्याचे देखील समोर आले आहे. यानंतर नागरिकांनी तक्रार केल्यास थेट साहेब जाऊन चोरी पकडतात व नंतर तडजोड न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात अशी देखील दबक्या आवाजात कामशेत शहरांमध्ये चर्चा आहे.
त्यामुळे महावितरणचा महसूल बुडवून चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना नवीन कनेक्शन देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

कामशेत महावितरण कार्यालयामध्ये अनेक अनागोंदी कारभार चालू असल्याचे नागरिकांकडून कळत आहे त्यामुळे या कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी केल्यास अनेक बनावट कनेक्शन दिल्याचे समोर येऊ शकते अशी चर्चा नागरिक करत आहेत त्यामुळे या कार्यालयाची व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी याबाबत लवकरच कामशेत शहरातील नागरिक मावळचे आमदार सुनील शेळके व महावितरणचे अधिकारी यांना निवेदन देणार आहेत.
………………….
प्रमोद महाजन –
महावितरण शाखा कामशेत प्रमुख
ग्राहकाची वीज बिलाची थकबाकी असताना त्याच जागी नवीन वीज कनेक्शन कोणी दिले याबाबत आपण माहिती घ्यावी व या संपूर्ण प्रकरणाची माहिती आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घ्यावी मी याबाबत काही बोलणार नाही
………………………..
विवेक सूर्यवंशी 
उपकार्यकारी अभियंता वडगाव मावळ
ग्राहकाची वीज बिलाची थकबाकी असताना त्याच जागी नवीन जोडणी केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले असल्याने यातून  कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे तसेच कंपनीचा महसूल देखील बुडवला गेल्याचा दिसत असल्याने प्रमोद महाजन यांना खुलासा करण्यासाठी स्मरणपत्र पाठवण्यात आले असून त्यावर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता राजगुरुनगर यांना (Maval ) देखील पत्र देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.