Maval : धामणेतील शाळेचा परिसर केला चकाचक

नेहरु युवा केंद्रातर्फे स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्र पुणे यांच्यावतीने स्वच्छता पंधरावड्यानिमित्त मावळ धामणे येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळेचा परिसर चकाचक करण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत सरपंच अविनाश गराडे, मुख्याध्यापक यांच्यासह स्थानिक नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी परिसर स्वच्छ ठेवण्याची सर्वांनी शपथ घेतली. तसेच शाळेच्या परिसरात लागवड करण्यासाठी 110 विविध प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण देखील करण्यात आले.

नेहरु युवा केंद्र पुण्याचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर, अक्षय गराडे, सोमनाथ गराडे, अनिकेत बुट्टे, सुमित लोहार, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मोरे यांचे मोहिमेसाठी सहकार्य लाभले. या स्वच्छता मोहिमेसाठी नेहरु युवा केंद्र मावळ तालुक्याच्या युवा प्रतिनिधी स्वप्ना भालेराव, बुद्धीतेजा बोदडे, चैतन्य घोगरे यांनी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.