BNR-HDR-TOP-Mobile

Maval : कबड्डी खेळांडूना कबड्डी मॅटसह पूर्ण संच भेट

एमपीसी न्यूज – कबड्डी हा जागतिक पातळीवर खेळला जाणारा खेळ आहे. मावळ तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वलवण लोणावळा यांना नऊ लक्ष रुपये किमतीचे कबड्डी मॅट आणि पूर्ण संच देण्यात आला.

मावळ तालुक्याचे आमदार संजय बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, त्याबद्दल मंडळाच्या वतीने आमदार संजय बाळा भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.

  • यावेळी लोणावळा नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजप युवा मोर्चा मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, नगरसेवक विजय इंगुलकर, रचना सिनकर, नारायण पालेकर, अरुण लाड, हर्षल होगले, लोणावळा शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू व नागरिक उपस्थित होते.
.