Maval : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे – संतोष खांडगे 

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. तसेच शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यां एवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे असल्याचे मत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी पवनानगर (Maval) येथे व्यक्त केले.

पवनानगर (Maval) येथील पवना शिक्षण संकुलातील मीराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थांंचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, पवना शिक्षण संकुलाचे पालक व सरपंच परिषेदेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र ठाकर, मावळ बाजार समिती अध्यक्ष नंदकुमार धनवे, मावळ खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षा कांचन भालेराव, भाजपा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, मावळ काँग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्ला शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, भोंगाडे ग्रुपचे भरत भोंगाडे, लोहगड सोसायटीचे चेअरमन गणेश धानिवले, कडधे ग्रामपंचायत सरपंच संजय केदारी, ठाकूरसाईचे सरपंच नारायण बोडके, शालेय समिती सदस्य नारायण कालेकर, प्रल्हाद कालेकर, प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका नीला केसकर, प्राथमिक विभागाचे प्रमुख गणेश साठे, तिकोणा उपसरपंच ज्ञानेश्वर मोहोळ, कामगार नेते संदीप पानसरे, महागाव सोसायटीचे तज्ञ संचालक बबनराव पडवळ, माजी उपसरपंच अनंता वर्वे, पोलीस पाटील अनंता खैरे यांंच्यासह पालक- शिक्षक उपस्थित होते.

Maths Day : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात

पवना शिक्षण संकुलातील (Maval) पालक सदस्य सुनील भोंगाडे यांनी विद्यार्थांंना मार्गदर्शन करताना, शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती असून देशाच्या विकास प्रक्रियेत वेळोवेळी शिक्षकांवर विविध जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. जबाबदाऱ्या शिक्षक समर्थपणे पेलून दाखवत विद्यार्थी घडवत असतात, असे विचार व्यक्त केले.

Pune Cyber Crime : प्रसिद्ध सराफाचे नाव घेऊन स्टेट बँकेला लावला 19 लाखांचा चुना

यावेळी संकुलातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत पाहुण्यांची व उपस्थितांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे संयोजन कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्या अंजली दौंडे, तर सूत्रसंचालन आडकर दुश्मन यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.