Maval Corona News : मावळमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच; आज नवीन 147  रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.12  )147 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 588 आहे.

शहरी भागात 90 रूग्ण तर ग्रामीण भागात 57 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 32  रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 50 रूग्ण आज सापडले आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 08 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 28,605  झाली आहे. तर दिवसभरात 154 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक येथे 08 रुग्ण सापडले. कान्हे  येथे 07 रुग्ण सापडले. कामशेत येथे 05 रूग्ण सापडले. कुरवंडे, तळेगाव दाभाडे (ग्रामीण)येथे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले. गहुंजे, कुणे नामा, तिकोणा,टाकवे बुद्रुक,वराळे व सोमाटणे येथे प्रत्येकी 03 रूग्ण सापडले. दारुंब्रे व  पांगळोली  येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले.तर कार्ला,चांदखेड,नाणे,कुणे अणसुटे,केवरे,जांभूळ व आंबी येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला.असे एकूण 57 रुग्ण सापडले.

27,492 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,176 ,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,748व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,421 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,345 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,260 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.11  टक्के आहे तर मृत्यू दर 1.84 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 229 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 128;, वडगाव नगरपंचायतमध्ये 28 व ग्रामीण भागात 203 असे एकूण 588  रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.