Maval Corona News : नवीन 141 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.13 )141 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 681 आहे.

शहरी भागात 93 रूग्ण तर ग्रामीण भागात 48 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 60 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 29 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 28,746 झाली आहे. तर दिवसभरात 48 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

गुरुवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत येथे 11 रुग्ण सापडले. फळणे येथे 07 रुग्ण सापडले. वराळे येथे 05 रूग्ण सापडले. गहुंजे व कान्हे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले. कुरवंडे, बेलज व काले येथे प्रत्येकी 02 रूग्ण सापडले. तर सुदुंब्रे, तळेगाव दाभाडे (ग्रामीण), ब्राम्हणवाडी (साते),नाणे,कुसगाव बुद्रुक, कडधे,बैर,आंबळे,इंदोरी,करंजगाव व शिरगाव येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला असे एकूण 48 रुग्ण सापडले.

27,540 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,236 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,777 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,425 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,438 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,308 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.08 टक्के आहे तर मृत्यू दर 1.83 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 269, लोणावळा नगरपरिषदमध्ये 148 वडगाव नगरपंचायतमध्ये 31,व ग्रामीण भागात 233 असे एकूण 681 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.