Maval Corona News : नवीन 142 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.16 ) 142 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला,तर तालुक्यात दिवसभरात 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 898 आहे.

शहरी भागात 83 रूग्ण तर ग्रामीण भागात 59 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 43 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 34 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 06 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 29,229 झाली आहे. तर दिवसभरात 74 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

रविवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे 15 रूग्ण सापडले.सोमाटणे येथे 10 रुग्ण सापडले. टाकवे बुद्रुक येथे 06 रुग्ण सापडले. कुणे नामा येथे 04 रूग्ण सापडले. वराळे व शिरगाव येथे प्रत्येकी 03 रुग्ण सापडले. काले,करूंज,कुरवंडे व वाकसई येथे प्रत्येकी 02 रूग्ण सापडले. इंदोरी, डोंगरगाव, शिवली, नाणे,कान्हे, बेडसे, नाणोली तर्फे चाकण, आंबी, कुसगाव बुद्रुक व उर्से येथे प्रत्येकी 01रुग्ण सापडला. असे एकूण 59 रुग्ण सापडले.

27,806 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,406 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,860 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,446 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,712 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,518; रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.13 टक्के आहे तर मृत्यू दर 1.80 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 317, लोणावळा नगरपरिषदमध्ये 182 वडगाव नगरपंचायतमध्ये 39 व ग्रामीण भागात 369 असे एकूण 898 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.