Maval Corona News : नवीन 122 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.18 ) 122 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला,तर तालुक्यात दिवसभरात 91जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1068 आहे.

शहरी भागात 69 रूग्ण तर ग्रामीण भागात 53 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 55 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 09 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 29,526 झाली आहे. तर दिवसभरात 91रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात गहुंजे येथे 08 रूग्ण सापडले. कान्हे येथे 06 रुग्ण सापडले. सोमाटणे, तळेगाव दाभाडे (ग्रामीण ) व कामशेत येथे प्रत्येकी 05 रुग्ण सापडले.वराळे, शिरगाव,कुरवंडे व कुसगाव बुद्रुक येथे प्रत्येकी 03 रूग्ण सापडले. आर्डव,कडधे व करूंज येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले.तर काले,उर्से, येळसे, मळवली नामा,वाकसई व करंजगाव येथे प्रत्येकी 01रूग्ण सापडला. असे एकूण 53 रुग्ण सापडले.

27,933 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,564 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,893 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,456 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,913 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,613रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.06 टक्के आहे तर मृत्यू दर 1.78 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 420, लोणावळा नगरपरिषदमध्ये 195 वडगाव नगरपंचायतमध्ये 43 व ग्रामीण भागात 410 असे एकूण 1068 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.