Maval Corona News : नवीन 121 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.20 ) 121 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 997 आहे.

शहरी भागात 45 रूग्ण तर ग्रामीण भागात 76 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 34 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 03 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 08 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 29,743 झाली आहे. तर दिवसभरात 141 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

गुरुवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात उर्से येथे 15 रूग्ण सापडले. तळेगाव दाभाडे (ग्रामीण)येथे 13 रुग्ण सापडले. कामशेत येथे 09 रुग्ण सापडले.टाकवे बुद्रुक येथे 07 रूग्ण सापडले. नवलाख उंब्रे व इंदोरी येथे प्रत्येकी 06 रुग्ण सापडले. वाकसई व सोमाटणे येथे प्रत्येकी 05 रूग्ण सापडले. तर येळसे, डोंगरगाव,पाटण,काले, डोणे, वराळे, नाणोली तर्फे चाकण, सुदुंब्रे, सुरवडी व शिवली येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला.असे एकूण 76 रुग्ण सापडले.

28,211 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,624 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,913 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,474 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 16,011 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,732 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.88 टक्के आहे तर मृत्यू दर 1.77 टक्के आहे.सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 388, लोणावळा नगरपरिषदमध्ये 136 वडगाव नगरपंचायतमध्ये 49 व ग्रामीण भागात 424 असे एकूण 997 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.