Maval Corona News : मावळमध्ये कोरोनाचा चढता आलेख; नवीन 261 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.21) 261 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1128 आहे. कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढता असला तरीही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत, त्यामुळे याबाबत काळजी कारण नसल्याचे सांगत नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे मावळ प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

शहरी भागात 209 रूग्ण तर ग्रामीण भागात 52 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 166 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 30 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 13 रूग्ण आज सापडले.तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 30004 झाली आहे. तर दिवसभरात 130 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे15 रूग्ण सापडले. वराळे येथे 07 रुग्ण सापडले. कामशेत येथे 06 रुग्ण सापडले. शिरगाव व कुसगाव बुद्रुक येथे प्रत्येकी 04 रूग्ण सापडले. नवलाख उंब्रे व काले येथे प्रत्येकी 03 रुग्ण सापडले. चिखलसे व इंदोरी येथे प्रत्येकी 02 रूग्ण सापडले. तर गहुंजे, मळवंडी ठूले, नायगाव, शिवली, कुरवंडे व माळवाडी येथे प्रत्येकी 01रुग्ण सापडला.असे एकूण 52 रुग्ण सापडले.

28,351;जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,790 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,993 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,487 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 16,220 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,784 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.49 टक्के आहे तर मृत्यू दर 1.75 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 494, लोणावळा नगरपरिषदमध्ये 159 वडगाव नगरपंचायतमध्ये 59 व ग्रामीण भागात 421 असे एकूण 1128 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.