Maval Corona News : नवीन 155 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.23 )155 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1117 आहे.

शहरी भागात 124 रूग्ण तर ग्रामीण भागात 31 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 112 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 07 रूग्ण आज सापडले आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 30,346 झाली आहे. तर दिवसभरात 142 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रविवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे येथे 06 रूग्ण सापडले. कान्हे व चिखलसे येथे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले. वराळे, चांदखेड व तळेगाव दाभाडे ( ग्रामीण)येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले माऊ,आढले बुद्रुक,परंदवडी,उर्से, बेबडओव्हळ, डोणे, सुदवडी, आंबी, नवलाख उंब्रे ब्राह्मणवाडी साते,व वडगाव येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला असे एकूण 31रुग्ण सापडले.

28,704 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 10,016 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,973 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,507 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 16,496 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,850 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.59 टक्के आहे तर मृत्यू दर 1.73 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 610 , लोणावळा नगरपरिषदमध्ये 113 वडगाव नगरपंचायतमध्ये 61 व ग्रामीण भागात 333 असे एकूण 1117 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.