-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval Corona News : दिवसभरात 60 नवे रुग्ण तर 55 जणांना डिस्चार्ज

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.21) 60 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 489 इतकी आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 661 आहे. शहरी भागात 51 तर ग्रामीण भागात 9 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 46 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,343 झाली आहे. तर दिवसभरात 55 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुणे नामा व साळुंब्रे प्रत्येकी 2, वाकसाई, आंबळे, वराळे, शिवणे व कुसगाव बुद्रुक प्रत्येकी 1 असे एकूण 9 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 11,192 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,488 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,944 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,198 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 12,630 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,713 रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.07 टक्के आहे तर मृत्यू दर 2.09 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 201, लोणावळा नगरपरिषदमध्ये 54, वडगाव नगरपंचायतमध्ये 32 व ग्रामीण भागात 374 असे एकूण 661 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.