Maval Corona News : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना कोरोनाची लागण झाली असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

माजी राज्यमंत्री भेगडे हे पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होते.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी (दि.15) मावळ तालुक्यात परत येत असताना त्यांच्या चालकाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, बाळा भेगडे यांना गुरुवारी (दि.15) त्रास होत असल्याने त्यांची कोरोनाची टेस्ट केली असता शुक्रवारी (दि.16) त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर घरीच पुण्यातील नामवंत डॉक्टर उपचार करत आहेत. ते स्वतः गृह विलगीकरण झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.