Maval Corona News : सलग दुसऱ्या दिवशी एकही रुग्ण पॉजिटीव्ह नाही 

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात  शनिवारी (दि.12 ) एकही रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर तालुक्यात दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10 आहे. शहरी भागात एकही रूग्ण नाही तर ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही. आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.
तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 32,036  झाली आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण बरा न झाल्याने घरी सोडण्यात आला नाही  . शनिवारी  कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही .

 31,501 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 11,035  लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,092 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,555 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,682 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,354 रुग्ण आढळून आले आहेत.
एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.33 टक्के आहे तर मृत्यू दर 1.64 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 06 लोणावळा नगरपरिषदमध्ये 01  वडगाव नगरपंचायतमध्ये 00 ग्रामीण भागात 03 असे एकूण 10 रुग्ण आहेत.
अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ  चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.