Maval Corona News : धक्कादायक ! ‘वेंकीज’मधील 161 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

एकूण 375 कामगारांची केली तपासणी; उर्वरित कामगारांच्या तपासणी अहवालाकडे लक्ष

एमपीसीन्यूज : पवन मावळातील बऊर हद्दीतील वेंकीज कंपनीमध्ये 161 कामगारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची स्थिती चांगली आहे.

शासनाच्या आदेशानुसार कंपनी प्रशासनाने दि.12 एप्रिल रोजी वेंकीज कंपनीतील 375 कामगारांची खाजगी लॅबमध्ये आरटीपीसीआर (RTPCR) टेस्ट केली होती. यामध्ये शुक्रवार व शनिवार (दि.16 व दि.17) पर्यंत 161 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. संदीप मुंडे, आरोग्य सेवक केतन जाधव, आरोग्य सेविका विना धुरंधर, आशा सेविका लता वाळुंजकर आदींच्या पथकाने या 161 कामगारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्यांचे गृह विलगकरण करण्यात आले. तसेच मास्क व सॅनिटायझर वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा आदी सूचना या कोरोनाबाधित कामगारांना देण्यात आल्या आहेत.

वेंकीजमधील 375 पैकी आतापर्यंत 161 कामगारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित कामगारांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.