Maval Corona News : नवीन 187 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात शनिवारी (दि.22 ) 187 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 211 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1104 आहे.

शहरी भागात 152 रूग्ण तर ग्रामीण भागात 35 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 114 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 23 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 15 रूग्ण आज सापडले.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 30191 झाली आहे. तर दिवसभरात 211 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे येथे 07 रूग्ण सापडले. उर्से येथे 04 रुग्ण सापडले. कुणे नामा येथे 03 रुग्ण सापडले. बेबडओव्हळ, वारू,कामशेत,ब्राह्मणवाडी साते, व काले येथे प्रत्येकी 02 रूग्ण सापडले. खडक गेव्हंडे, वराळे, नाणे, घोणशेत, आंबळे, आंबी,टाकवे बुद्रुक,तळेगाव दाभाडे (ग्रामीण ),कुरवंडे,कुसगाव बुद्रुक व कान्हे येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला .असे एकूण 35 रुग्ण सापडले.

28,562 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,904 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,996 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,502 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 16,372 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,819 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.06 टक्के आहे तर मृत्यू दर 1.74 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 541, लोणावळा नगरपरिषदमध्ये 140 वडगाव नगरपंचायतमध्ये 62 व ग्रामीण भागात 361 असे एकूण 1104 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.