Maval Corona News : नवीन 20 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज- मावळ तालुक्यात रविवारी (दि.5) 20 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 270 आहे.

शहरी भागात 03 तर ग्रामीण भागात 17 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रुग्ण सापडला. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 26,958 झाली आहे. तर दिवसभरात 16 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात मळवली नामा 05, सांगवडे 04, कान्हे 02, कुसगाव बुद्रुक, महागाव, कल्हाट, इंदोरी, काले व तळेगाव दाभाडे ग्रामीण प्रत्येकी 01असे एकूण 17 रुग्ण सापडले. 26,165 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,527 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,449 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1339 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,315 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,643 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.06 टक्के आहे तर मृत्यू दर 1.94 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 100 लोणावळा नगरपरिषदमध्ये 41 वडगाव नगरपंचायतमध्ये 12 व ग्रामीण भागात 117 असे एकूण 270 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.