Maval Corona Udpate : मावळात 90 नवे रुग्ण; 56 जणांना डिस्चार्ज, 744 सक्रिय रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.9) 90 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 56  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.

मागील 15  दिवसात तळेगाव दाभाडे शहरात 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने आतापर्यंत तालुक्यात 244  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर सक्रिय रुग्णांची संख्या 744 आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 22  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 15 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 15  रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 744  रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10,603 झाली आहे. तर दिवसभरात 56  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 52 रुग्ण तर ग्रामीण भागात 38  रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात कामशेत 11, काले 4 , भोयरे 3, मळवंडी ठुले 3, चावसर 2, सोमवडी 2, भोयरे, भडवली, घोणशेत, ब्राम्हणवाडी (साते), कुसगाव पमा, कान्हे, नवलाख उंब्रे, माळवाडी, वराळे, नाणे, साते, महागाव व टाकवे बुद्रुक येथ प्रत्येकी 1 असे एकूण 38 रुग्ण सापडले.

9615 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3511, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1999 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 677 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 6187  रुग्ण तर ग्रामीण भागात 4416  रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90.68  टक्के आहे तर मृत्यू दर 2.3 टक्के आहे.
सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 302 , लोणावळा नगरपरिषद मध्ये 176 , वडगाव नगरपंचायत मध्ये 44  व ग्रामीण भागात 222 असे एकूण 744 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.