Maval Corona Upadate : दिवसभरात नवे 84 रुग्ण तर 96 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.30) 84 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 314 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1399 आहे. शहरी भागात 62 तर ग्रामीण भागात 22 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 15 रुग्ण सापडले.

लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 35 रुग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 13032 झाली आहे. तर दिवसभरात 96 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 15, नेसावे, चांदखेड, कान्हे, करंजगाव, साळुंब्रे, थोरण, उकसान, प्रत्येकी 1 एकूण 22 रुग्ण सापडले.

11319 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील 10 दिवसात कोरोना ने 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 314 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 4099, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2586 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 788 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 7473 रुग्ण तर ग्रामीण भागात 5559 रुग्ण आढळून आले आहेत. 7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.86 टक्के आहे तर मृत्यू दर 2.41 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 378, लोणावळा नगरपरिषद मध्ये 325, वडगाव नगरपंचायत मध्ये 60 व ग्रामीण भागात 636 असे एकूण 1399 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.