Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 09 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 07 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात बुधवार (दि.24) 09 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 61आहे.

लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत प्रत्येकी 01 रुग्ण सापडला तर तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 06 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 61 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8247 झाली आहे. तर दिवसभरात 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 08 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात कान्हे येथे 01 रुग्ण सापडला.

ग्रामीण भागात 01 रुग्ण सापडला तर शहरी भागात 08 रुग्ण सापडले. तर 61 रुग्ण सक्रिय आहेत. 7962 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2524, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1617 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 543 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4684 रुग्ण तर ग्रामीण भागात 3563 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.