Maval Corona Update : मावळात आज 10 जणांना डिस्चार्ज; 6 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात मंगळवार (दि.2) 06 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 118 आहे.

लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत व तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 118 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8337 झाली आहे. तर दिवसभरात 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात एकही रुग्ण सापडला नाही. ग्रामीण भागात सोमाटणे व गहुंजे येथे प्रत्येकी एक 03 रूग्ण सापडले.

_MPC_DIR_MPU_II

सध्या मावळ तालुक्यात 118 रुग्ण सक्रिय आहेत. 7987 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2557, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1646 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 551 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत शहरी भागात 4754 रुग्ण तर ग्रामीण भागात 3583 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.