Maval Corona Update : मावळात दिवसभरात 100 पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, शनिवारी दिवसभरात 100 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर लोणावळा येथील कोरोनाबाधित 74  वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 4  हजार 395, तर मृतांची संख्या 140 झाली आहे. आजपर्यंत 3 हजार 449 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 67  जणांना घरी सोडण्यात आले.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 100 जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक 30, लोणावळा येथील 20, नवलाख उंब्रे येथील 10, वडगाव येथील पाच, कामशेत व वराळे येथील प्रत्येकी चार, सोमाटणे, सुदवडी व शिवणे येथील प्रत्येकी तीन, इंदोरी व कुसगाव पमा येथील प्रत्येकी दोन, माळवाडी, टाकवे बुद्रुक, कुसगाव बुद्रुक, गहुंजे, शिरगाव, देवले, कांब्रे नामा, चिखलसे, दारूंब्रे, केवरे, कोथुर्णे, गोडूंब्रे, शेवती व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 395 झाली असून त्यात शहरी भागातील 2  हजार 559  तर ग्रामीण भागातील 1 हजार 836  जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक 1 हजार 335 , लोणावळा येथे 958  तर वडगाव येथे रुग्णसंख्या 266 एवढी झाली आहे.

आत्तापपर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 हजार 449 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 67  जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात 806  सक्रिय रुग्ण असून त्यातील 540  लक्षणे असलेले तर 266 लक्षणे नसलेले रुग्ण आहेत.

लक्षणे असलेल्या 540  जणांमध्ये 444 जणांमध्ये सौम्य तर 93  जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या 806  जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.