Maval Corona Update: मावळात दिवसभरात 104 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांचा मृत्यू, 42 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. शनिवारी दिवसभरात नव्याने 104 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनाबाधित तिघांचा मृत्यू झाला.

 तळेगाव दाभाडे येथील 90 वर्षीय पुरुष, आढले येथील 66 वर्षीय पुरुष व पवनानगर येथील 58 वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 952 झाली असून आत्तापर्यंत 106 जणांचा मृत्यू  झाला आहे. तर 1 हजार 955 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 104 जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक 38, वडगाव येथील 18, तळेगाव दाभाडे येथील 12, सोमाटणे येथील 06, कुणे नामा येथील 04, कामशेत, वराळे व माळवाडी येथील प्रत्येकी 03, चांदखेड व कार्ला येथील प्रत्येकी 02 तर कुसगाव बुद्रुक, कान्हे, कुसगाव बुद्रुक, नवलाख उंब्रे, जांभूळ, वळक, दारूंब्रे, साळुंब्रे, केवरे, वरसोली, वेहेरगाव, सोमवडी, आंबळे व दिवड येथील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन  हजार 952 झाली असून त्यात शहरी भागातील 1 हजार 686 तर ग्रामीण भागातील 1 हजार 266 जणांचा समावेश आहे.

तळेगावात सर्वाधिक 951, लोणावळा येथे 538 तर वडगाव येथे रुग्णसंख्या 197 एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 955 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 42 जणांना घरी सोडण्यात आले.

सध्या तालुक्यात 891 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 383 जण लक्षणे असलेले तर 508 जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या 383 जणांपैकी 269 जणांमध्ये सौम्य तर 102 जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. 12 जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या 891 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.