Maval Corona Update : दिवसभरात 105 नव्या रुग्णांची भर; एकाही रुग्णाला डिस्चार्ज नाही

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.12) 105 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही.

आज एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असुन आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 912 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 01 रुग्ण सापडला. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 06 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 912 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10,930 झाली आहे. तर दिवसभरात एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 07 रुग्ण तर ग्रामीण भागात 98 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 32, कुसगाव बुद्रुक 18, वराळे 11, कामशेत 08, नवलाख उंब्रे 04, सोमाटणे 03, कान्हे, पारवडी, साई व नानोली तर्फे चाकण प्रत्येकी 02, परंदवडी, इंदोरी, तिकोणा, ठाकुरसाई, खांडशी, साळुंब्रे, माळवाडी, टाकवे बुद्रुक, कुरवंडे, कशाळ, नायगाव, शिवली, आंबी व जांभवडे प्रत्येकी 01 असे एकूण 98 रुग्ण सापडले.

9768 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज तळेगाव दाभाडे हद्दीत 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3556, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2046 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 691 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6293 रुग्ण तर ग्रामीण भागात 4637 रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.37 टक्के आहे तर मृत्यू दर 2.29 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 275, लोणावळा नगरपरिषद मध्ये 177, वडगाव नगरपंचायत मध्ये 52 व ग्रामीण भागात 408 असे एकूण 912 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.