Maval Corona Update :  तालुक्यात दिवसभरात 106 नवीन रुग्ण तर 94 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि. 18) 106 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 94 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 1130 आहे. शहरी भागात 54 तर ग्रामीण भागात 52 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 47 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 7 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11552 झाली आहे. तर दिवसभरात 94 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 21 थुगाव 8, सोमाटणे 7, कान्हे 4, शिवणे 3, ओझर्डे 2, मोहितेवाडी 2, ब्राह्मणवाडी (साते), जांभूळ, कुसगाव खुर्द, मळवली पमा, परंदवडी प्रत्येकी एक असे एकूण 52 रुग्ण सापडले.

10172 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3730, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2247 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 715 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 6692 रुग्ण तर ग्रामीण भागात 4860 रुग्ण आढळून आले आहेत. 5 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.05 टक्के आहे तर मृत्यू दर 2.16 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 279, लोणावळा नगरपरिषद मध्ये 281, वडगाव नगरपंचायत मध्ये 53 व ग्रामीण भागात 517 असे एकूण 1130 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.