Maval Corona Update : दिवसभरात 106 रुग्णांची भर तर 103 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.14) 106 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकाही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 941 आहे. शहरी भागात 66 तर ग्रामीण भागात 40 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 49 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 17 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11,123 झाली आहे. तर दिवसभरात 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक 11, काले 05, कामशेत 04, शिंदगाव 04, ब्राम्हणोली 03, टाकवे बुद्रुक 02, वडेश्वर 02, औंढे खुर्द, बुधवडी, कुरवंडे, करंजगाव, कार्ला, साई, मोहितेवाडी, वाकसई, वारू येथे प्रत्येकी एक असे एकूण 40 रुग्ण सापडले.

9932 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3626, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2097 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 696 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6419 रुग्ण तर ग्रामीण भागात 4704 रुग्ण आढळून आले आहेत. 04 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.29 टक्के आहे तर मृत्यू दर 2.25 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 274, लोणावळा नगरपरिषद मध्ये 204, वडगाव नगरपंचायतमध्ये 44 व ग्रामीण भागात 419 असे एकूण 941 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.