Maval Corona Update : मावळात आज 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह ; 5 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवार (दि.12) 11 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 47 आहे.

वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 05, तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 03 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 47 रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8165 झाली आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 08, तर ग्रामीण भागात कुसगाव, सुदुंबरे व वराळे येथे प्रत्येकी 01 रूग्ण सापडला.

तालुक्यात सध्या 47 रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 7894 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2482, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1613 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 538 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4633 रुग्ण तर ग्रामीण भागात 3532 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.