Maval Corona Update : दिवसभरात 110 नवे रुग्ण तर 199 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.28) 110 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पुन्हा तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत रुग्ण संख्या सर्वाधिक झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 276 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1355 आहे. शहरी भागात 77 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 68 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 12783 झाली आहे. तर दिवसभरात 199 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात गहूंजे 5, टाकवे बुद्रुक 5, काले 3, कुरवंडे 3, शेवती 3 ब्राम्हणोली 2, नाणे 2, शिरगाव, वाडीवळे, वडेश्वर, तळेगाव दाभाडे ग्रामीण, कुणे अनसुटे, कुसगाव बुद्रुक, कुसुर व साते प्रत्येकी 1 असे एकूण 35 रुग्ण सापडले.

11152 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 4043, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2499 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 776 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 7318 रुग्ण तर ग्रामीण भागात ५5465 रुग्ण आढळून आले आहेत. 6  रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.24 टक्के आहे तर मृत्यू दर 2.16 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 322, लोणावळा नगरपरिषद मध्ये 298, वडगाव नगरपंचायत मध्ये 68 व ग्रामीण भागात 667 असे एकूण 1355 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.