Maval Corona Update : तालुक्यात 113 नवे रुग्ण तर 64 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.7) 113 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 498 इतकी आहे.

रुग्ण संख्येत वाढ होत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 694 आहे. शहरी भागात 45 तर ग्रामीण भागात 68 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 33 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 11 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 24,515 झाली आहे. तर दिवसभरात 64 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 6, कान्हे 5, टाकवे बुद्रुक 5, खडक गेव्हंडे 4, तळेगाव दाभाडे ग्रामीण 4, नवलाख उंब्रे 4, कार्ला 3, निगडे 3, वाकसाई, कामशेत, आढले खुर्द, आंबळे, कल्हाट, कशाळ, पवळेवाडी प्रत्येकी 2, वेहरगाव, नायगाव, देवघर, टाकवे खुर्द, कुसगाव खुर्द, ब्राम्हणवाडी, करंजगाव, शिरगाव, परंदवडी, जोवन, सोमाटणे, आढले बुद्रुक, कुणे नामा, दहिवली, बऊर, आंबी, पारवडी, नागाथली, इंदोरी, इंगळुन व गहूंजे प्रत्येकी 1 असे एकूण 68 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 23,322 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,788 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4099 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1249 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,136 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,379 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.13 टक्के आहे तर मृत्यू दर 2.03 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 181 लोणावळा नगरपरिषदमध्ये 101 वडगाव नगरपंचायतमध्ये 40 व ग्रामीण भागात 372 असे एकूण 694 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.