Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 116 नव्या रुग्णांची नोंद; 74 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शनिवारी दि. 19) कोरोनाचे 116 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 609 झाली आहे. तर दिवसभरात 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मिळालेल्या अहवालानुसार तळेगाव दाभाडे 4 (पुरूष, 77, 68, 67 व 37 वर्षीय महिला), लोणावळा 5 (पुरूष 72, 66, 50 वर्ष व 71, 65 वर्षीय महिला), कामशेत 2 (69 वर्षीय पुरूष व 37 वर्षीय महिला), कान्हे 39 वर्षीय पुरूष व गोडूंब्रे येथील 52 वर्षीय व्यक्ती अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 61 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 55 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 22, लोणावळा शहरात 36, वडगावात 3 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 3 हजार 609 रुग्णांमध्ये सध्या 894 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 591जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 109, लोणावळा नगरपरिषद 736 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 229 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 535 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.