Maval Corona Update: कडधे व माऊ येथील दोन कुटुंबांतील 12 जणांना कोरोनाची बाधा, तालुक्यात 17 सक्रिय रुग्ण

Maval Corona Update: 12 people from two families in Kaddhe and Mau suffer from corona, 17 active patients in the taluka कोरोना प्रसार रोखण्यासाठी कन्टेन्मेंट झोनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – कडधे येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या निकटवर्ती संपर्कातील सहा व्यक्तींचे तसेच माऊ येथील 80 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या निकटवर्ती सहा व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. एकाच दिवशी 12 नव्या कोरोना रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मावळवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या या 12 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे त्यांना तळेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण  कोरोनाबाधितांची संख्या 33 झाली असून त्यापैकी 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता तालुक्यात 17 सक्रिय रुग्ण आहेत.

पवन मावळातील कडधे तर आंदर मावळातील माऊ येथे कन्टेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. तरी या दोन्ही ठिकाणी कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये व बाहेरील व्यक्तींनी सदर झोनमध्ये प्रवेश करू नये. हे कटाक्षाने पाळण्याची गरज असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले आहे.

माऊ येथील पॉझिटीव्ह आलेले महिलेच्या घरातील मुलगा, सून, दोन नातू, एक नात सून व एक पणतू यांना तर कडधे येथील पॉझिटीव्ह असलेल्या घरातील दोन मुलगे, दोन सुना, एक नातू, व एक नात सून यांनाही कोरोची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.