Maval Corona Update : मावळात आज 122 नवे रुग्ण; 35 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.17) 122 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 250  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 1118 आहे.

शहरी भागात 82  तर ग्रामीण भागात 40 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 33 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 44  रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले.  तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11,446 झाली आहे. तर दिवसभरात 35  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुरवंडे 9, कामशेत 6, कान्हे 4, शेवती 3, टाकवे बुद्रुक 2, ठाकुरसाई 2, चिखलसे 2, बऊर 2, भोयरे 2, आंबी, जांभूळ, कांब्रे नामा, कुसगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, वडगाव, नानोली तर्फे चाकण, राजपुरी प्रत्येकी एक असे एकूण 40 रुग्ण सापडले.

10078 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3730, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2200 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 708 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6638 रुग्ण तर ग्रामीण भागात 4808 रुग्ण आढळून आले आहेत. 5 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.05  टक्के आहे तर मृत्यू दर 2.18  टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 326 , लोणावळा नगरपरिषद मध्ये 245, वडगाव नगरपंचायतमध्ये 52 व ग्रामीण भागात 495 असे एकूण 1118 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.