Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 123 नवीन रुग्ण; 109 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 16) कोरोनाचे 123 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 291 झाली आहे. तर दिवसभरात 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 75 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 48 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 40, लोणावळा शहरात 35 रुग्ण आढळले आहेत. वडगावमध्ये आज एकही रुग्णाची नोंद झाली नाही.

एकूण 3 हजार 291 रुग्णांमध्ये सध्या 876 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 308 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 32, लोणावळा नगरपरिषद 653 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 214 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 392 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

तळेगाव दाभाडे ग्रामीण 4, कामशेत 6, टाकवे बु 2, कडधे 3, कुसगाव बु 3, वराळे 2, कुरवंडे 1, इंदोरी 4, सोमाटने 3, निगडे 1, कान्हे 3, शिरगाव 1, ब्राह्मणवाडी साते 1, नवलाख उंबरे 1, वडेश्वर 1, साळूम्बरे 1, बेबडओहळ 1, येळसे 1, कार्ला 1, भोयरे 4, वरसोली 4.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.