Maval Corona Update : मावळात आज 128 नवे रुग्ण; 114 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.4) 128  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 114  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. मावळ तालुक्यात आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

मावळात आतापर्यंत 318  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1639  आहे. शहरी भागात आज 57 तर ग्रामीण भागात 71  रुग्ण सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 38  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 17  रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले .

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या14,608 झाली आहे. तर दिवसभरात 114  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 10, इंदोरी 7, गहूंजे 7, साळुंब्रे 6, कुसगाव पमा 5, कुसगाव नामा 5, चांदखेड4,  पाचाणे 4, तळेगाव दाभाडे ग्रामीण 3, जांभवडे 3, पुसाणे 2, सोमाटणे 2, टाकवे खुर्द 2, मळवंडी ठुले, आंबळे, नाणे, ब्राम्हणवाडी, करंजगाव, कांब्रे नामा, भाजगाव, उकसान, वाडीवळे, चिखलसे, फांगणे, कोथुर्णे, प्रत्येकी 1 असे एकूण 71 रुग्ण सापडले.

12,651  जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 318  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 4935, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2819 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 823 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 8577  रुग्ण तर ग्रामीण भागात 6031  रुग्ण आढळून आले आहेत. 7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.06  टक्के आहे तर मृत्यू दर 2.18  टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 500, लोणावळा नगरपरिषद मध्ये 288, वडगाव नगरपंचायत मध्ये 60 व ग्रामीण भागात 791  असे एकूण 1639 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.