Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 129 नवीन रुग्ण; चार हजारांपर्यंत पोहोचला तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 21) कोरोनाचे 129 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 963 झाली आहे. तर दिवसभरात 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

वडगाव (पुरुष, 52 वर्ष), तळेगाव (पुरुष, 75 वर्ष) येथील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 71 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 58 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 16, लोणावळा शहरात 45 आणि वडगाव शहरात 10 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 3 हजार 963 रुग्णांमध्ये सध्या 1 हजार 34 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 802 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 216, लोणावळा नगरपरिषद 834 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 239 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 674 रुग्ण आढळून आले आहेत.

>ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 1 हजार 674 रुग्णांची ग्रामीण भागात नोंद झाली आहे

सोमवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदोरी 12, कान्हे 11, कुसगाव बु 6, कामशेत 5, कडधे 5, नवलाख उंबरे 3, चांदखेड 2, सोमाटणे 2, सुदवडी 2, जांभूळ 2, माळवाडी, कुरवंडे, कुणे ना मा, काले, करंजगाव, अजीवली, नेसावे, तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 65 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 9 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 74 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.