Maval Corona Update : मावळात आज 129 नवे रुग्ण; 76 जणांना डिस्चार्ज,797 सक्रिय रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.11) 129 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 244 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 797आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 28 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 31 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 797 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10,732 झाली आहे. तर दिवसभरात 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 64 रुग्ण तर ग्रामीण भागात 65 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 30, कामशेत 06, वराळे 05, इंदोरी 03, कान्हे 02, सोमाटणे 02, सुदुंबरे 02, महागाव 02, करूंज 02, कधडे 02, आंबी, बेडसे, दहिवली, गहूंजे, कांब्रे नामा, काले, कुसगाव पमा, शिरगाव व टाकवे बुद्रुक येथे प्रत्येकी 01 असे एकूण 65 रुग्ण सापडले.

9691 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 244 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3539, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2030 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 682 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6251 रुग्ण तर ग्रामीण भागात 4481 रुग्ण आढळून आले आहेत.

एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90.03 टक्के आहे तर मृत्यू दर 2.27 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 304, लोणावळा नगरपरिषद मध्ये 174, वडगाव नगरपंचायत हद्दीत 47 व ग्रामीण भागात 272 असे एकूण 797 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.