Maval corona Update : दिवसभरात 130 रुग्णांची भर तर 44 जणांना डिस्चार्ज  

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सोमवारी (दि.29) सर्वाधिक 130 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 848 आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 52 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 24 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 08 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 848 रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9635 झाली आहे. तर दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 84 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात सोमाटणे 12, परंदवडी 06, कामशेत 05, वराळे 05, तळेगाव दाभाडे ग्रामीण 04, साळुंब्रे 04, टाकवे बुद्रुक 03, गहूंजे 03, इंदोरी, पाथरगाव, फळणे व कान्हे, प्रत्येकी 01 एकूण 46 रुग्ण सापडले.

8553 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मागील 4 दिवसांपूर्वी 03 मृत्यू झाले असून आतापर्यंत 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3116, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1794 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 621 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5531 रुग्ण तर ग्रामीण भागात 4104 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.