Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 131 नवे रुग्ण तर 117 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 22) 131 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक रुग्ण होते आता लोणावळा नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक रुग्ण संख्या 326 आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 254 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रूग्णांची संख्या 1239 आहे. शहरी भागात 69 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 21 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 45 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11959 झाली आहे. तर दिवसभरात 117 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात बऊर 34, वराळे 6, कुरवंडे 3, दहिवली 2, इंदोरी 2, नानोली तर्फे चाकण 2, नाणे, नायगाव, कुसगाव बुद्रुक, कान्हे, चिखलसे, आंबी, नवलाख उंब्रे, साळुंब्रे, शिलाटणे, सुदवडी, सुदुंबरे, तळेगाव दाभाडे ग्रामीण व वेहेरगाव प्रत्येकी 1 असे एकूण 62 रुग्ण सापडले.

10466 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3761, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2357 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 747 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6865 रुग्ण तर ग्रामीण भागात 5094 रुग्ण आढळून आले आहेत.

6 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.52 टक्के आहे तर मृत्यू दर 2.12 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 231, लोणावळा नगरपरिषदमध्ये 326, वडगाव नगरपंचायतमध्ये 65 व ग्रामीण भागात 613 असे एकूण 1239 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.