Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 149 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 49 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 22) कोरोनाच्या 49 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 12 झाली आहे. तर दिवसभरात 149 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कुसगाव बुद्रुक (पुरुष, 72 वर्ष), तळेगाव दाभाडे (पुरुष, 59 वर्ष), (पुरुष, 65 वर्ष), लोणावळा (पुरुष, 79 वर्ष) येथील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 23 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 26 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 7, लोणावळा शहरात 8 आणि वडगाव शहरात 8 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 12 रुग्णांमध्ये सध्या 931 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 950 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 223, लोणावळा नगरपरिषद 842 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 247 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 700 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

मंगळवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, सोमाटणे 7, चांदखेड 2, कान्हे 2, शिरगाव 2 तर माळवाडी, उर्से, इंदोरी, दारूंब्रे, शिवणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 61 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 9 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 70 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.