Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 159 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 65 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 28) कोरोनाचे 65 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 560 झाली आहे. तर दिवसभरात 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कामशेत (महिला, 77 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 35 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 30 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 17, लोणावळा शहरात 14 आणि वडगाव शहरात 4 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 560 रुग्णांमध्ये सध्या 632 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 769 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 379, लोणावळा नगरपरिषद 990 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 280 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 911 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

सोमवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 10, इंदोरी 4, सोमाटणे 4, वराळे 2, कान्हे 2, कार्ला 2, टाकवे बु , चिखलसे, कुसगाव प मा, फळणे, वडेश्वर, डोणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 53 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 8 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 61 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.