Maval Corona Update : दिवसभरात 162 नवे रुग्ण तर 109 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.9) 162 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 322 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1806 आहे.

शहरी भागात 97 तर ग्रामीण भागात 65 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 43 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 34 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 20 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 15505 झाली आहे. तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक 13, कामशेत 12, नवलाख उंब्रे 5, तळेगाव दाभाडे ग्रामीण 5, वराळे 3, सोमाटणे 3, चिखलसे 3, बेबड ओहळ 3, वळवंती 2, मोहितेवाडी 2, कुसवली 2, कान्हे 2, जांभूळ 2, आंबी, भोयरे, ब्राम्हणवाडी साते, गोवित्री, माळवाडी, साळुंब्रे, टाकवे खुर्द व उर्से प्रत्येकी 1 एकूण 65 रुग्ण सापडले.

13377 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5181, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3121 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 860 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 9062 रुग्ण तर ग्रामीण भागात 6443 रुग्ण आढळून आले आहेत.

2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.28 टक्के आहे तर मृत्यू दर 2.08 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 453, लोणावळा नगरपरिषद मध्ये 434, वडगाव नगरपंचायत मध्ये 69 व ग्रामीण भागात 850 असे एकूण 1806 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.