Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 162 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 100 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (रविवारी, दि. 27) कोरोनाचे 100 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 495 झाली आहे. तर दिवसभरात 162 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तालुक्यात आज दिवसभरात 18 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 55 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 45 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 27, लोणावळा शहरात 18 आणि वडगाव शहरात 10 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 495 रुग्णांमध्ये सध्या 727 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 610 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 362, लोणावळा नगरपरिषद 976 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 276 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

रविवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, इंदोरी 5, कामशेत 4, वराळे 3, दारुंब्रे 3, टाकवे बु 2, डोंगरगाव 2, सोमाटणे 2, दहिवली 2, नाणे 2, औंढे खु 2, परंदवडी, गहुंजे, सुदुंबरे, जांभूळ, नायगाव, कांब्रे ना मा, मोहितेवाडी, येळसे, कार्ला, भोयरे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 56 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 9 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 65 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.